हॉलंडमधील ‘रश्मिन कलोपासक समूहा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तेथील मराठी मंडळींनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. आल्समेर येथे संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात हॉलंडमधील मराठी मंडळींनी तयार केलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सलील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
कुलकर्णी यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आदित्य आठल्ये यांनी कुलकर्णी यांना तबल्यावर संगीतसाथ केली. संस्थेतर्फे बाळू बापट यांच्या हस्ते सलील कुलकर्णी आणि आदित्य आठल्ये यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वृंदा व गिरीश ठाकूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.