News Flash

केक नको, मान द्या

माजी पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांच्यापाठोपाठ आता विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी प्रत्येक पोलिसाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्याचे परिपत्रक जारी कले आहे. या

| April 2, 2013 01:22 am

माजी पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांच्यापाठोपाठ आता विद्यमान आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी प्रत्येक पोलिसाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्याचे परिपत्रक जारी कले आहे. या परिपत्रकामुळे सामान्य पोलिसामध्ये आनंद होण्याऐवजी वेगळीच प्रतिक्रिया उमटली आहे. आमचे वाढदिवस साजरे करण्याऐवजी पोलीस ठाण्यात वरिष्ठांनी आम्हाला योग्य तो मान दिला तरी पुरे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे.
पोलीस ठाण्यातील सर्वात दुर्लक्षित घटक जर कोणी असेल तर तो म्हणजे पोलीस शिपाई. हाच शिपाई वरिष्ठ निरीक्षक वा निरीक्षकाचा ऑर्डरली असल्यास त्याची पाचही बोटे ‘तुपात’ असतात. परंतु त्या तुलनेत इतर पोलिसांना मलिदा सोडाच; परंतु वरिष्ठांकडून किमान चांगली वागणूकसुद्धा मिळत नाही. ऑर्डरली वा खास शिपाई मजा करीत असताना इतर पोलिसांना राबावे लागते. हे तर सर्वज्ञात आहे की, अधिकाऱ्यापेक्षा सामान्य पोलीसच खूप काम करीत असतो. गुन्हे विभागात काम करणारा पोलीस सर्वात जास्त व्यस्त असतो. परंतु या सगळ्यात खालच्या पोलिसांना वरिष्ठांकडून मान मिळतोच असे नाही. त्यामुळे आयुक्तांचे परिपत्रक जारी झाल्याबरोबर अनेक पोलिसांकडून, ‘वाढदिवस नको, पण मान द्या’, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.
वाढदिवसाला केक कापण्याऐवजी आम्हाला नेहमी मानाची वागणूक द्या. आमच्यात भेदभाव करू नका, अशी आर्जवी विनंती या पोलिसांनी केली आहे. वरिष्ठ निरीक्षकाचा ऑर्डरली हप्ते गोळा करतो म्हणून तो चांगला व कार्यक्षम, हा समज दूर केला तरी आमच्यावर अन्याय होणार नाही, असे या पोलिसांचे म्हणणे आहे.  पटनाईक यांनी कायम सामान्य पोलिसांचीच बाजू घेतली. त्यांनीही पोलीस ठाण्यातील पोलिसाला मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. परंतु प्रत्यक्षात आजही काही अपवाद सोडले तर पोलीस ठाण्यात सहकारी अधिकाऱ्यांकडूनच पोलिसांना फारशी चांगली वागणूक मिळत नाही.
ऑर्डर्लीनाच मान का ?
प्रत्येक पोलीस ठाण्यात ऑर्डर्लीलाच मान असतो. याचे कारण म्हणजे तो संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हप्ते गोळा करीत असतो. त्यांची काळजी घेत असतो. तो पोलीस दलात असला तरी एकप्रकारे घरगडय़ाचीच कामे करीत असतो. तरीही त्याचा मान खूप असतो. त्याने काही सांगितले की, वरिष्ठही त्याचे तात्काळ ऐकत असतात. मात्र या पद्घतीमुळे अनेकांवर अन्याय होतो. सर्व पोलिसांना वरिष्ठांनी एकाच पद्धतीने वागणूक दिली तरी आम्ही वाट्टेल ती कामे करण्यास तयार आहोत, असे शिपायांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2013 1:22 am

Web Title: dont celebrates our birthday try to maintain our status in society demand from police staff
Next Stories
1 गोरेगावमधील आरे कॉलनी ही मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखली जाते.
2 तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी ‘सैफ’ नाही
3 जागतिक स्वमग्नता जागृती दिनानिमित्त ‘माय डिअर यश’चा विशेष खेळ
Just Now!
X