एचआयव्ही, एड्स या आजारावर एआरटी सारखी प्रभावी उपचारपद्धती सुरू झाली असून त्यामुळे पूर्वीसारखे या आजाराबाबत घाबरण्याचे कारण नाही. मधुमेह झालेला रुग्ण ज्या प्रमाणे आपली काळजी घेतो, त्याप्रमाणे एचआयव्ही संसíगतांनी सकारात्मक भावनेतून काळजी घेतल्यास त्यांचे जीवनमान सुधारेल, असे मत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी व्यक्त केले.
जागतिक एड्स दिनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी शहरात कोनापुरे चाळीतील समाज मंदिरात ‘नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लििव्हग विथ एचआयव्ही प्लस व फॅमिली प्लॅिनग असोसिएशन ऑफ इंडिया’ सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचआयव्ही संसíगतांचा मेळावा आणि ‘विहान’ या आधार तथा समुपदेशन प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मालदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. फॅमिली प्लॅिनग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर हे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी डॉ. कल्याण शहाणे, जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारे, डॉ. सचिन कोरे, प्रयास संस्थेच्या रेणूका जाधव, डॉ. सय्यद आदी उपस्थित होते.
    या प्रसंगी बोलताना डॉ. येळेगावकर यांनी, नियमित व्यायाम व सकस आहार घेऊन एचआयव्ही संसíगतांनी आपले आरोग्य चांगले ठेवावे. नियमित तपासण्या करून व वेळीच उपचार करून घ्यावे. ध्यान, योगासन, प्राणायाम करून जीवन सकारात्मक व आनंदी बनवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी डॉ. कल्याण शहाणे व डॉ. सय्यद यांनीही मार्गदर्शन केले. माधुरी गरड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
‘विहान’ प्रकल्पाबाबतची माहिती प्रकल्प समन्वयक समाधान माळी यांनी दिली. या प्रसंगी एचआयव्ही संसíगतांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करण्यात आली. रंजना अक्षंतल यांनी सूत्रसंचालन केले. तर सुगत गायकवाड यांनी आभार मानले.