दामदुप्पट योजनेच्या नावाखाली गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यांविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. संबंधित फायनांस कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुंतवणूकदारांमध्ये नवी मुंबईसह मुंबईतील नागरिकांचा देखील समावेश आहे. वाशी रेल्वे स्थानकानजीकच्या हावरे फॉटासिया मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील नॅनो विंगमध्ये अभिजीत मधुकर पाटील आणि त्याची पत्नी वनिता पाटील यांनी कालभैरव अ‍ॅग्रो कन्सेप्ट प्रा.लि आणि कालभैरव फायनान्सीयल सव्‍‌र्हिस या संस्थेच्या नावाने ५ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेत चेंबूर येथील सुभाष कटीच यांनी ५ लाख रुपये आणि इतर तीन जणांनी ८ लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र कालावधी पूर्ण होऊन देखील रक्कम न मिळाल्याने चारही गुतंवणूकदाराने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे समोर आल्याने पाटील दाम्पत्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्य़ात अभिजीत पाटील याला बुधवारी अटक करण्यात आली असून त्याची पत्नी वनिता हीचा शोध सुरू आहे. अभिजीत याला न्यायालयात हजर केले असता, १५ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संस्थेत पैसे दुप्पट करण्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ वाशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पठारे यांनी केले आहे.

narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
fraud of 44 lakh with investors in Dombivli by giving lure of increased interest
वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक