News Flash

दुहेरी खून पूर्ववैमनस्यातून

टेंबलाईवाडी येथील दुहेरी खून प्रकरण पूर्ववैमनस्यातून व पैशाच्या वादातून झाले असून या प्रकरणी आठ जणांना आनेवाडी टोल नाका येथे सापळा रचून अटक केली, अशी माहिती

| February 5, 2014 03:55 am

टेंबलाईवाडी येथील दुहेरी खून प्रकरण पूर्ववैमनस्यातून व पैशाच्या वादातून झाले असून या प्रकरणी आठ जणांना आनेवाडी टोल नाका येथे सापळा रचून अटक केली, अशी माहिती अपर पोलीस प्रमुख जोती प्रिया सिंग यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आम्ही त्यांना संपवले नसते तर त्यांनी आमचा गेम केला असता, अशी कबुली आरोपींनी आज पोलिसांना दिली.
जयदीप उर्फ हणमा राजु चव्हाण, घायल उर्फ साहील लक्ष्मण कवाळे(वय २४), काल्या उर्फ रियाज सदलु देसाई (वय २४, रा. विक्रमनगर), विशाल सागर गिरी (वय २१ विक्रमनगर), सद्दामहुसेन नजीर देसाई (वय २३, रा. विक्रमनगर),रोहीत सुधीर कांबळे (वय २१, रा. विक्रमनगर), फारुख अहमद शेख (वय २८, रा. विक्रमनगर), इम्रान राजू मुजावर (रा. विक्रमनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तवेरा गाडी (एमएच ०९-एक्यू ३३०६) जप्त करण्यात आली.तर धनाजी वसंत मिसाळ (रा. विक्रमनगर), अमोल हळदीकर (रा. टेंबलाईनाका) यांचा शोध अद्याप सुरु आहे.
पोलिसांनी सांगीतलेली अधिक माहिती अशी की, टेंबलाई रेल्वे फाटक परिसरात रविवारी (दि. 2 फेब्रु) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समीर खाटीक (वय 26, रा. विक्रमनगर) तर बीएसएनएल टॉवरजवळ नितीन िशदे (वय 22, रा. दौलतनगर) या दोघांचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपींना पकडण्यासाठी शोध पथके आजरा, चंदगड, संकेश्वर, निपाणी, सावंतवाडी, पणजी याठिकाणी रवाना झाली होती. आरोपींकडे पैसे कमी असल्याने त्यांनी पुण्याकडे पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलीसांनी आरोपींच्या एका मित्रास गाठून त्याला आरोपींना पसे नेण्यासाठी कोल्हापुरात येण्यासंबंधी फोन  करावयास लावला. मात्र आरोपींनी यास नकार देत अन्य ठिकाणी बोलावले. यानुसार आणवाडी टोल नाक्यानजीक सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोंपीकडे चौकशी केली असता, त्यांनी नितीन शिंदे याच्या क्लब वर काम करणा-या अमित हेगडे याचेकडून जयदीप चव्हाण याने पसे उसने घेतले होते. उसने घेतलेले पसे परत देत नसल्याने हनमा चव्हाण यांने अमित हेगडे यास मारहाण केली, याबाबतची फिर्याद अमितने दिली होती. यावरुन नितीन शिंदे व समिर खाटीक यांनी हनमंत चव्हाण यास राहत्या घरी जाउन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातून हनमा बचावला. याचाच राग मनात धरुन नितीन शिंदे व समीर खाटीक यांना मारल्याची कबुली चव्हाण याने दिली.
याबाबतची फिर्याद अमर शशिकांत शिरसे (वय १८,रा. नवश्या मारुती मंदिर शेजारी, राजारामपुरी 14 वी गल्ली, कोल्हापूर) यांनी दिली आहे. या घटनेचा तपास अपर पोलिस प्रमुख जोति प्रिया सिंग व प्रभारी शहर पोलिस अधीक्षक वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. पांचाळ, गुंडविरोधी पथकाचे उपनिरीक्षक रमेश खुणे, विकास जाधव यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 3:55 am

Web Title: double murder in kolhapur
टॅग : Kolhapur
Next Stories
1 सांगलीतून वर्षभरात ५१८ महिला, मुली बेपत्ता
2 कोल्हापूरजवळ सशस्त्र दरोडा; मारहाणीत दोघे जखमी
3 गुंतवणूक योजनेतून सांगलीत महिलांची लाखोंची फसवणूक
Just Now!
X