मुंबईच्या महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकपदी सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागप्रमुख प्रा. डॉ. माया पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे. या पदावर रुजू होण्यासाठी त्यांना विद्यापीठाने मान्यताही दिली आहे.
प्रा. डॉ. पाटील यांनी सोलापूर विद्यापीठात पुरातत्त्व विभागाची मुहूर्तमेढ रोवली असून त्यांनी विद्यापीठ पुरातन वस्तू संग्रहालयाची उभारणी चांगल्या प्रकारे केली आहे. या वस्तू संग्रहालयासाठी त्यांनी विविध पुरातन वस्तू, मूर्ती महाराष्ट्र व इतर भागातून कानाकोपऱ्यातून आणल्या आहेत. डॉ. माया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी विविध ठिकाणी नोकरी तथा संशोधनकार्य करीत आहेत. पुरातत्त्व विभागाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे असून मुंबईत राज्यस्तरीय कार्यालय आहे. डॉ. माया पाटील यांनी दक्षिण सोलापुरात कारकल व माढा तालुक्यातील वाकाव येथे उत्खनन केले आहे. पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकपदी त्यांच्या निवडीबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
 

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
mumbai university budget marathi news, mumbai university budget 857 crores marathi news
मुंबई विद्यापीठाचा ८५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर