कासारी खोरा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक ग्रामीण विकास संस्थेतर्गत शिवछावा प्रतिष्ठान यांच्या वतीने विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जे.नाईक यांना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य के.एस.चौगुले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते पीटर चौधरी, जिल्हा परिषद सदस्य योगिराज गायकवाड, मराठी चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव आदी उपस्थित होते.
दुष्काळी व डोंगरी भागातील मौजे हिरवे, ता.खानापूर, जि.सांगली येथील शंकर जयवंत नाईक यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. आतापर्यंत ३७ वर्षांच्या अनुभवातून त्यांची रसायनशास्त्राची ७० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम.एस्सी.टी.अँड डी) त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी काम करीत आहे. त्यांचे संशोधनावर दोन शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते डॉ.अप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी, शिवाजी विद्यापीठचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना उपरोक्त ‘समाजरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 1:29 am