ललितेत्तर ग्रंथासाठी असणारा डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्या ‘गोफ जन्मांतरीचे’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या गुरुवारी (दि. २५) नाशिक येथे परशुराम खेडकर नाटय़गृहात सायंकाळी साडेसहा वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांना या अगोदर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात रेणू दांडेकर, बाळ सामंत, निरंजन घाटे, अनिल अवचट, बाळ फोंडके, रवी बापट, अभिजीत घोरपडे, सुबोध जावडेकर, वैशाली करमरकर हे यापूर्वीचे मानकरी होत.
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर या प्रसिध्द बालरोगतज्ज्ञ असून, १९८३ पासून कराड येथे त्यांनी वेद्यकीय सेवा सुरू केली. सन २००२ पासून त्या लिहित्या झाल्या. छात्रप्रबोधन, दिवाळी अंकातील त्यांचा लेख विशेष गाजला. उन्मेष प्रकाशन, मौज प्रकाशन, राजहंस प्रकाशन अशा अनेक प्रकाशकांनी त्यांच्या लेखांना प्रसिध्दी दिली. मौज प्रकाशन गृहातर्फे ‘बंद खिडकीबाहेर’ या ललित लेखांचे पुस्तक २०१२ मध्ये प्रकाशित झाले तर राजहंस प्रकाशनातर्फे ‘गोफ जन्मांतरीचे’ -अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे हे उत्क्रांती, जेनेटिक्स या विषयावर अभ्यासपूर्ण विज्ञानविषयक पुस्तक प्रकाशित झाले आहे. 

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
nitin gadkari on emergency
“… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली आठवण; आणीबाणीचा केला उल्लेख!