News Flash

डॉ. विलास साळुंके अनुवादित ‘जीएं’च्या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन

शहरातील इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विलास साळुंके यांनी अनुवादित केलेल्या प्रसिध्द कथा लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘श्ॉडोज् इन द डेझर्ट’ आणि ‘विदुषक अ‍ॅण्ड अदर

| July 26, 2014 01:54 am

शहरातील इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विलास साळुंके यांनी अनुवादित केलेल्या प्रसिध्द कथा लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘शॅडोज् इन द डेझर्ट’ आणि ‘विदुषक अ‍ॅण्ड अदर स्टोरीज्’ या पुस्तकांचे प्रकाशन पुणे येथे जीए यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि जीए कुटुंबियांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन आणि जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर उपस्थित होते.
या प्रसंगी जीएंच्या कथांचे वाचन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि डॉ. अजय जोशी यांनी केले.  डॉ. साळुंके यांनी जीएंच्या ‘स्वामी’ आणि ‘पाणमाय’ या आपण अनुवादित कथांना ग. प्र. प्रधान यांनी दिलेली दाद आपल्यासाठी प्रेरणा ठरल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नंदा पैठणकर यांनीही जीएंच्या आठवणी सांगितल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:54 am

Web Title: dr vilas salunke translated english books published
Next Stories
1 ‘..तर धनगर समाज बिऱ्हाड आंदोलन करणार’
2 पावसाची विश्रांती
3 उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा लढविण्याची शिवसेनेची चाचपणी
Just Now!
X