07 August 2020

News Flash

छताचा थर कोसळून दोन महिला जखमी

छताचा सिमेंटचा थर कोसळून दोन महिला किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथे जिल्हा व सत्र न्यायालयात घडला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ

| November 9, 2012 01:57 am

छताचा सिमेंटचा थर कोसळून दोन महिला किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथे जिल्हा व सत्र न्यायालयात घडला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला. जखमी महिलांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले.

न्यायालयातील बाररूममध्ये या महिला बसल्या होत्या. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक छतावरचा सिमेंट काँक्रीटचा थर कोसळला. या वेळी तेथे या दोन महिला व अन्य काही लोक बसले होते. छताचा थर अंगावर कोसळून या दोन महिला जखमी झाल्या.

रंजना म्हस्के (वय ३०) व रूपाली मुळे (वय ३३, एन ७, औरंगाबाद) अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांची पळापळ झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2012 1:57 am

Web Title: drop of buliding slap two women injured
टॅग Aurangabad
Next Stories
1 घरबसल्या तक्रार नोंदवण्याची सोय
2 लातूरमध्ये धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा
3 युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप
Just Now!
X