News Flash

तोतया पोलिसांनी लुटले दोन लाखांचे दागिने

दागदागिने परिधान करून विवाह समारंभावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून तोतया पोलिसांनी पोबारा केला. ही घटना अंधेरी पूर्व येथील गुंदवली परिसरात

| January 11, 2013 01:31 am

दागदागिने परिधान करून विवाह समारंभावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून तोतया पोलिसांनी पोबारा केला. ही घटना अंधेरी पूर्व येथील गुंदवली परिसरात घडली.
वडाळा येथील विवाह समारंभावरून प्रभाकर लोटणकर आपल्या पत्नीसह अंधेरी येथील आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. अंधेरीतील गुंदवली परिसरात पोहोचले असताना लोटणकर दाम्पत्याला दोन जणांना पोलीस असल्याचे सांगून थांबवले. हल्ली सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला असून तुमच्याकडील मौल्यवान दागिने बॅगेत ठेवा दोन तोतया पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानुसार बॅगेत ठेवतानाच त्या दोघांनी प्रभाकर लोटणकर यांना बोलण्यात गुंग ठेवले आणि तितक्यात दुसऱ्या तोतया पोलिसाने बॅगेत ठेवलेले दागिने अलगद काढून घेतले.  दागिने घालून पायी फिरत जाऊ नका, असे सांगून ते दोघे निघून गेले. काही अंतरापर्यंत गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर लोटणकर यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकिगत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 1:31 am

Web Title: duplicate police robbers robbery of two lakhs gold
टॅग : Robbery
Next Stories
1 रेल्वे बनावट जातमुचलका घोटाळा : आरपीएफच्या पोलिसांवर आरोपपत्र दाखल होणार
2 यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १९ जानेवारीपासून
3 हृदयेश फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांना मिळणार ‘सूर-अनंत’ची भेट
Just Now!
X