येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एचपीटी कॉलेज अभ्यास केंद्रातील वृत्तपत्रविद्या पदवी व पदविका शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्वाद संस्कृती’, ‘स्वाद संवाद’ आणि ‘ई-मेजवानी’ या अनियतकालिकांचे प्रकाशन उद्योगपती श्रीरंग सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहचून सक्षमतेने प्रश्न मांडावेत. मांडलेल्या प्रश्नाच्या प्रतिक्रियेकडेही लक्ष द्यावे, असे मनोगत यावेळी सारडा उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीरंग सारडा यांनी केले. यावेळी आरोग्य विज्ञान शाखेचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भूजलतज्ज्ञ डॉ. जयदीप निकम, विभागीय संचालक पी. एम. मुसळे, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, समन्वयक श्रीकांत सोनवणे उपस्थित होते. विद्यार्थी संपादक नीलेश पवार, दीपक बैचे, नितीन शिंदे, दिग्विजय मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून लक्ष्मण घाटोळ व रेखा खोकराळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. निकम, मुसळे आणि प्राचार्य सूर्यवंशी यांनी भाषण केले. सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले.