पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, ‘लोकसत्ता’ आणि ‘टीजेएसबी बँक’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धे’ चा पारितोषिक वितरण सोहळा येत्या सोमवारी होणार आहे. आपटे रस्त्यावरील ‘हॉटेल कोहिनूर एक्झिक्युटिव्ह’ मध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी राजू इंदूलकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतील ९९९९ रुपयांचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक अनिल तिळेकर यांना, तर ६६६६ रुपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक अभिजीत गणोरकर यांना जाहीर झाले आहे. याशिवाय आदित्य जगताप, अर्चना गाडे, अविनाश शिंदे, दीपक शेळके, कौशिक गद्रे, प्रज्ञा वाळिंबे, रवींद्र गोहड, संजय चौरघे आदींना प्रत्येकी २००१ रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर झाले आहे.