महाविद्यालयांतील फेस्टिव्हल म्हटलं की आपल्या डोळय़ासमोर धम्माल, मस्ती आणि स्पर्धा असे चित्र येते. पण माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालयात याला अपवाद असलेला एक वैचारिक महोत्सव सुरू होत आहे. पोदार महाविद्यालयात ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत अर्थशास्त्र या विषयाला वाहिलेला ‘मोनेटा’ हा महोत्सव रंगणार आहे.
मोनेटामध्ये आपल्याला अर्थशास्त्र विषयाशी संबंधित व्याख्याने याचबरोबर त्याच विषयाला धरून आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि खेळांची रेलचेल असणार आहे.
यामध्ये ‘कार्बन क्रेडिट कर्झ’, ‘म्युच्युअल फंड चॅलेंज’, ‘द सीएफओ चॅलेंज’, ‘बोर्डरूम चॅलेंज’, तसेच अर्थशास्त्रीय संकल्पना, आयपीओ चॅलेंज आदी स्पर्धा आणि कार्यक्रम होणार आहेत. तसेच कार्यशाळाही होणार आहेत. या महोत्सवत अनेक नामवंत अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महोत्सवाची माहिती  http://www.podarmoneta.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.