आम्हाला कामावर रुजू करा अन्यथा, इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी प्रार्थना उपोषणावर बसलेल्या ३१ शिक्षणसेवकांनी राष्ट्रपतीला पाठविलेल्या पत्राद्वारे केली असल्याची माहिती शिक्षण सेवक संघटनेचे अध्यक्ष आर.आर. कटरे यांनी मंगळवारी उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  कधी काळी असलेल्या शिक्षणसेवकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. िशदे यांना त्यांची नियुक्ती नियमबाह्य़ असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ केल्याचे पत्र दिल्याच्या विरोधात शिक्षणसेवक जिल्हा परिषदेच्या द्वारासमोर उपोषणाला बसले आहेत.
काल उपोषणाचा २२ दिवस असूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या संदर्भातील पत्र १० जानेवारीला प्रशासनाच्या वतीने गोंदिया जिल्हा परिषदेला मिळूनही मिळालेल्या गोंदिया जिल्हा परिषदेतील घडय़ाळी तासाप्रमाणे काम केलेल्या उमेदवारांना दिलेले शिक्षण सेवकांचे आदेश कायम ठेवण्याबाबतचे पत्र पाठवून यावर अंतिम अहवाल मागितला होता.
मात्र, दोन महिने लोटून ही अहवाल गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयुक्त कार्यालयाला पाठविलेला नाही. तसेच शिक्षणसेवकांच्या उपोषणाचा आज २२ वा दिवस असून पुढे कोणतीही आशेची किरण त्यांच्या आयुष्यात दिसत नसल्यामुळे त्यांना कामावर रुजू करावे अन्यथा, इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी प्रार्थना उपोषणावर बसलेल्या ३१ शिक्षणसेवकांनी राष्ट्रपतीला पाठविलेल्या पत्राद्वारे केली असल्याची
माहिती शिक्षण सेवक संघटनेचे अध्यक्ष आर.आर. कटरे यांनी आज उपोषण स्थळी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली.
तसेच या संदर्भात राज्यपालांची भेट घेऊन आपली समस्या मांडणार असल्याचेही त्यांनी कळविले. पत्रकार परिषदेला अध्यक्ष आर.आर. कटरे, रामेश्वर
हलमारे, एफ.टी. नागफासेसह इतर उपोषणकत्रे उपस्थित होते.