News Flash

कन्यका नागरी बँके च्या आठव्या शाखेचे उद्घाटन

चंद्रपूर येथील कन्यका नागरी सहकारी बँक च्या गडचिरोली येथे आठव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते.

| April 3, 2013 02:47 am

चंद्रपूर येथील कन्यका नागरी सहकारी बँक च्या गडचिरोली येथे आठव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार मारोतराव कोवासे, प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय आईंचवार, गडचिरोली नगरपरिषदेचे अध्यक्ष भूपेश कुळमेथे आदी उपस्थित होते.
कुठल्याही संस्थेचा व्यवहार पारदर्शक असला की, त्या संस्थेचा विस्तार होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून या बँकेकडे बघावे लागेल. संस्थेच्या संचालकांनी मेहनत व चिकाटीने कार्य केल्यामुळेच आज बॅकेचा व्यवसाय ५२५ कोटींवर पोहोचला आहे, असे उद्गार बॅकेच्या उद्घाटन प्रसंगी कोवासे यांनी काढले. शहरवासीयांच्या आर्थिक गरजा बँक पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या बचतीवर अधिक व्याज मिळावे, तसेच कमीतकमी दरावर कर्ज उपलब्ध करून देण्याचे बँॅकेचे धोरण असून या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आईंचवार यांनी केले.
आज बँक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून या बँकेने बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे मत उसेंडी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मंजूषा तातावार, तर आभार डी.जी.सोनपित्रे यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:47 am

Web Title: eight branch opening of kanyaka bank
टॅग : Chandrapur
Next Stories
1 नक्षलग्रस्त विशेष भत्याविरोधात शिक्षकांचे ५ एप्रिलला आंदोलन
2 वृत्तपत्र वाचकांवर अतिरीक्त भरूदड अन्यायकारक
3 विदर्भाची शेती पारंपरिक चक्रव्यूहाच्या फे ऱ्यात
Just Now!
X