डोंबिवली पश्चिमेत अंबिकानगर, देवीचा पाडा, महाराष्ट्रनगर, गरिबाचा पाडा भागांत विजेचा दिवस-रात्र लपंडाव सुरू असून मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी महावितरण नागरिकांना शॉक देत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
ए.सी., फ्रीज, पंखे, गीझर या वस्तू विजेवर चालत असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतो.  खंडित वीजपुरवठय़ामुळे पालिकेकडून सोसायटीला होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होत आहे. महावितरण वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ाविषयी कोणतीही माहिती नागरिकांना देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पावसामुळे किरकोळ वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत राहतील. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडलेला नाही. पावसापूर्वीची सर्व कामे महावितरणने पूर्ण केली असल्याने नागरिकांना खंडित वीजपुरवठय़ाचा त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.
    -राजेंद्र मशाळकर,
कार्यकारी अभियंता, महावितरण