जिल्हय़ातील सेनगाव येथील संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेत ८६ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह अन्य पाचजणांविरुद्ध सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
पतसंस्थेचे लेखा परीक्षक अनंतकुमार दोडय़ा यांनी या प्रकरणी सेनगाव पोलिसात फिर्याद दिली. संत नामदेव नागरी सहकारी संस्थेच्या सेनगाव शाखेत तत्कालीन व्यवस्थापक संतोष भालेराव मोरक्या याने संगनमत करून २१ जानेवारी २०१० ते ४ ऑक्टोबर २०१२ दरम्यान वेळोवेळी खातेदारांच्या नावे बनावट दस्तावेज तयार केले. खोटय़ा सहय़ा करून कर्जास मंजुरी देऊन ८६ लाख २५७ रुपये रकमेचा अपहार केल्याचा तक्रारीत आरोप केला आहे. सेनगाव पोलिसांनी संतोष मोरक्या, तसेच संतोष भिकाजी लांडगे, रतनलाल मोहनलाल भट्टड, गुलाब धर्मा राठोड, कमलेश तापडिया व राहुजी नथुजी घाटोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.