‘एकांश’ या संस्थेतर्फे अपंग उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली असून या मेळाव्याला गुरुवारी तीनशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
एकांश ट्रस्ट ही अपंग लोकांसाठी काम करणारी संस्था असून अपंग लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवते. अपंग विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यांच्यातील कौशल्ये कंपन्यांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने एकांश ट्रस्टतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला पहिल्याच दिवशी तीनशे विद्यार्थी उपस्थित होते. हा मेळावा कोथरूड येथील हर्षल हॉल येथे १० व ११ जानेवारी हे दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांपासून अगदी पदव्युत्तर स्तरापर्यंत शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीही या मेळाव्याला उपस्थित होते. यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळा सोडलेल्या काही अपंग उमेदवारांचाही समावेश होता.
विविध नामांकित कंपन्या या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या
होत्या.