News Flash

नद्यांना मारक जलपर्णी निर्मूलनाचे यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून तयार

पंचगंगा, कृष्णा नदीला मारक ठरलेल्या जलपर्णीचा विळखा नेस्तनाबूत करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरूण पुढे आले असून त्यांनी अल्प खर्चात जलपर्णी निर्मूलन यंत्र तयार केले आहे.

| June 11, 2013 01:41 am

पंचगंगा, कृष्णा नदीला मारक ठरलेल्या जलपर्णीचा विळखा नेस्तनाबूत करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरूण पुढे आले असून त्यांनी अल्प खर्चात जलपर्णी निर्मूलन यंत्र तयार केले आहे. या यंत्राचे शिरोळ येथे तहसीलदारांसमोर प्रात्यक्षिक केले असून यंत्राचा वापर करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेसह लोक प्रतिनीधींचे उंबरे झिझवले तरीही सृजनशील तरूणांना प्रतिसाद मात्र मिळत नाही.
कोल्हापुरातील रंकाळा तलाव आणि पूर्ण पंचगंगा नदी सद्या जलपर्णीने व्यापली आहे. या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचरांनाही त्रास होत आहे. गतवर्षी इचलकरंजीत पसरलेली काविळीची साथ ही जलपर्णीचीच देन होती. मात्र प्रशासनाने याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही.
पर्यावरणास घातक ठरणाऱ्या जलपर्णी काढण्यासाठी मानवी प्रयत्नही अपुरे ठरतात. कारण जलपर्णीचा मानवी त्वचेशी संपर्क आल्यास घाज सुटण्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे मानवी श्रम शक्ती वापरून जलपर्णी काढून टाकणे अशक्य ठरते. याचा विचार करून जयसिंगपूरच्या मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिक विभागातील अंतिम वर्षांत शिक्षण घेणाऱ्या मिरज तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ‘वॉटर हायसिन रिमुव्हर’ हे मशीन तयार केले आहे. बोटीवर बसविल्या जाणाऱ्या या मशीनसाठी १ लाख २५ हजार रुपये खर्च आला आहे. जयसिंगपूरच्या रोलपॉन इंजिनीअरच्या मदतीने हे मशीन तयार केले असून दहा चौरस मिटर पाण्यावरील जलपर्णी काढण्यासाठी मशीनला अवघा अर्धा तास पुरा आहे. रंकाळा परिसरात असणारी जलपर्णी एक फूट उंचीची असून पंचगंगा व कृष्णेत असणाऱ्या जलपर्णीची उंची दोन फुट आहे. त्यासाठी योग्य ती यंत्रणा या यंत्रात करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी संतोष कुंभार, अमित भस्मे, निखीन क्षिरसागर, तानाजी भोसले, नामदेव बाबर, मनोज चौगुले, साहिद आझमी, अमोल बाड, सतीश पाटील, प्रफुल्ल पवार, आणि आशिष मुळे आदी विद्यार्थ्यांनी प्राचार्य पी.आर.मुतगी आणि शिक्षक आर.एस.पोवार, ए.ए.निकम, व ए.के.गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र तयार केले आहे.  शिरोळचे तहसीलदार संजय पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या यंत्राची प्रत्यक्ष चाचणी घेतली. मात्र आíथक नियोजना अभावी या यंत्राचा प्रभावी वापर करण्यास असमर्थता दर्शविली.  कारगीर तरुणांनी कोल्हापूर महापालिकेशी संपर्क साधूनही या यंत्राची माहिती दिली. तसेच काही लोकप्रतिनीधींशी संपर्क साधून चाचणी वेळी घेतलेली चित्रफीतही दर्शविली. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 1:41 am

Web Title: engineering students made jalparni prevention machine
Next Stories
1 ‘महावितरण’च्या मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी शिवसेनेच्यावतीने निदर्शने
2 बंद घर फोडून १ लाखांचा ऐवज चोरीस
3 छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून निसर्गज्ञान, पर्यावरण जागृती
Just Now!
X