पर्यावरण दिन उत्साहात साजरा
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ मोहन कुलकर्णी यांनी केले. नाशिक शहर भाजपच्या वतीने आयएमए सभागृहात आयोजित पर्यावरण जागृतीविषयक कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, उत्तर महाराष्ट्र भाजपचे सहसंघटनमंत्री राजेंद्र फडके, प्रदेश सचिव सीमा हिरे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, सरचिटणीस सुरेश पाटील आदी उपस्थित होते. घन कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास या कचऱ्याचा काही भाग पुनप्र्रक्रियेसाठी वापरता येऊन उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीस्कर होईल, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
 पर्यावरण संरक्षणाच्या कायदे प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास पर्यावरण संरक्षण मोठय़ा प्रमाणावर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी नाशिक शहर भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी शहर प्रदूषणमुक्त करण्याचे आवाहन फडके यांनी केले. उपमहापौर कुलकर्णी यांनी पर्यावरण संरक्षणसारख्या उपक्रमांमध्ये आपण सहभागी होऊ असे आश्वासन दिले.
या वेळी दीपक मंडळाच्या वतीने सुरेश गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा व पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर पथनाटय़ सादर केले. सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.

‘निमा’तर्फे पर्यावरण जनजागृती अभियान
नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने निमा हाऊस येथे पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अ. सो. फुलसे, प्राचार्य किशोर पवार, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. धनश्री हरदास, राजेंद्र जाधव उपस्थित होते.
फुलसे यांनी अन्न वाचविणे ही काळाची गरज असून आवश्यक तेवढेच पदार्थ खरेदी करा व त्यातून पर्यावरण वाचवा असे आवाहन केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांनी एमआयडीसीने पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद केले. राजेंद्र जाधव, डॉ. हरदास यांनीही मनोगत व्यक्त केले. अभियानात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरणावर आधारित स्टिकर व पोस्टर यांचे अनावरण करण्यात आले. इको फॉल्क्स व दीपक मंडळातर्फे पर्यावरण संवर्धनावर पथनाटय़ सादर करण्यात आले. सूत्रसंचालन सौजन्य पाटील यांनी केले. यानंतर सायकल फेरी काढण्यात आली. कोका-कोला कंपनीत सुमारे २५० रोपे लावून अभियानचा समारोप झाला.
 पर्यावरणप्रेमी पुरस्कार प्रदान सोहळा
भुसावळ- जळगाव येथील व. वा. वाचनालयाच्या सभागृहात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आदर्श पर्यावरण प्रेमी’ पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वन्यजीवांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही राजूरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टायगर रिसर्च अँड कॉन्झव्‍‌र्हेशन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे तर जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक सुरेंद्र चोपडे, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक पी. जी. राहुरकर, उपवनसंरक्षक सी. एन. धारणकर, चातक संस्थेचे अनिल महाजन, मराठी विज्ञान परिषदेचे सुनील पवार  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजूरकर यांनी पर्यावरण संवर्धन व वन्यजीवांबद्दल अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.  ज्येष्ठ पक्षीमित्र केशर उपाध्ये, शिल्पा गाडगीळ, वन्यजीव आणि वनस्पती अभ्यासक राहुल सोनवणे, सर्पतज्ज्ञ राजेंद्र ठोंबरे, पर्यावरण प्रेमी भीमराव सोनवणे, वृक्षमित्र नितीन नन्नावरे, सेवानिवृत्त साहाय्यक वृक्ष लागवड अधिकारी व्ही. जी. पाटील आदींचा राजूरकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. पर्यावरणप्रेमी टिकमदास तेजवाणी यांनाही सन्मानित  करण्यात आले. सूत्रसंचालन विजय लुल्हे आणि अश्विन पाटील यांनी केले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव बाळकृष्ण देवरे यांनी आभार मानले.

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण