पर्यावरणप्रेमी गणेभक्तांसाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करून गणरायाची आरास केलेल्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी सजावटीचे छायाचित्र काढून पाठवायचे आहे. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागात घेण्यात येणार असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक ९,९९९ रुपयांचे असेल. दुसरे पारितोषिक ६,६६६ तर विशेष पारितोषिक २,००१ रुपयांचे असणार आहे. सोबत विजेत्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह दिले जाईल.
दीड ते अकरा दिवसांच्या घरगुती गणपतीसाठी स्पर्धक भाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी ‘पाच बाय सात’ आकाराची तीन रंगीत छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयामध्ये १६ सप्टेंबपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्वीकारली जातील. छायाचित्र व माहिती पोस्ट, कुरिअर किंवाीूॠंल्ली२ँं@ॠें्र’.ूे वर पाठवू शकता. उशिरा मिळालेल्या छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी. प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर नसावा. स्पर्धेसाठी पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये गणेशमूर्ती, मखर इत्यादींची सजावट परीक्षकांना स्पष्ट दिसली पाहिजे. छायाचित्रे तीनही बाजूने वेगवेगळी घ्यावीत. प्रत्येक छायाचित्रांच्या सोबत स्पर्धकाचे नाव, घरचा पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल सोबत सजावटीसाठी वापरलेल्या साहित्याची यादी थोडक्यात जोडावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मुंबई- लोकसत्ता, ब्रॅण्ड मार्केटिंग, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमन पॉईंट, दूरध्वनी – ६७४४०३६९. ठाणे- अजयकुमार चुघ, लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, दूरध्वनी – २५३९९६०७. नाशिक- वंदन चद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, मोबाइल- ९४२२२४५०६५. पुणे- रोहित कुलकर्णी, दि इंडियन एक्स्प्रेस लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजी नगर, दूरध्वनी – ०२०-६७२४१०००. औरंगाबाद- समीर कल्याणकर, लोकसत्ता, मालपानी ओबेरॉय टॉवर्स, पहिला मजला, गव्हर्न्मेंट मिल्स स्कीमसमोर, जालना रोड, दूरध्वनी- ०२४०-२३४६३०३, मोबाइल- ९९२२४००९७२. अहमदनगर- संतोष बडवे, वितरण विभाग, लोकसत्ता, आशिष सथ्था कॉलनी स्टेशन रोड, दूरध्वनी- २४५१९०७/ २४५१५४४/ ९९२२४००९८१. नागपूर- ज्ञानेश्वर महाले-वितरण विभाग, लोकसत्ता, १९ ग्रेट नाग रोड, दूरध्वनी- ०७१२-२७०६९२३/ २७०६९९७/ ९८२२७२०००९.