शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वैज्ञानिक विकास व्हावा आणि त्यांनी प्रयोगनिष्ठ व्हावे या उद्देशाने युवा झेप प्रतिष्ठानतर्फे प्रा. राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीची स्थापना करण्यात आली आहे. दक्षिण अंबाझरी मार्गावरील ब्लाईंड रिलिफ असोसिएशनमध्ये ही संस्था कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या शिक्षण व्यवस्थेत विज्ञान शिक्षणातही साचलेपण आहे. विद्याथ्यार्ंच्या उपजत चौकस बुद्धीला चालना मिळायला हवी. शिक्षण व्यवस्थे अभाव दूर करणे हे प्रा. राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरी या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सभोवताल घडणाऱ्या नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना कशा घडतात, या विषयीचे अवलोकन विद्याथ्यार्ंमध्ये जिज्ञासा निर्माण करू शकते. परंतु अवलोकन करणे, नवनवे प्रयोग करून बघणे, अशा प्रयोगाच्या नोंदी ठेवणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे यातील थरार यांत्रिकी पद्धतीच्या शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनुभवता येत नाही. वैज्ञानिक घडामोडीतील गतिमानता आणि वैज्ञानिक शिक्षणातील गतीशिलता याची सांगड या संस्थेत घातली जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि त्यांना विविध वैज्ञानिक उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणकीय विज्ञानाच्या प्रयोगशाळेत विद्याथ्यार्ंना प्रत्यक्ष काम करण्याची संधी विद्याथ्यार्ंना मिळेल. अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागपुरात प्रथमच अशा प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोगांना वाहिलेली संस्था आकारला येत आहेत.
दरवर्षी २९ जानेवारीला प्रा. राजेंद्रसिंह यांच्या जन्मदिनी ‘यंग  सायंटिस्ट डे’ साजरा करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवापर्यंत सकाळी ९ ते ११, दुपारी ३ ते ५ आणि सायंकाळी ५ ते ७ या या कालावधीत सातवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग करता येईल. वर्षभरात प्रत्येक विद्यार्थ्यांला किमान ३० ते ४० प्रयोग करून बघता येईल, असेही जोशी यांनी सांगितले.