20 September 2020

News Flash

आठवडय़ानंतरही लक्ष्मण माने पोलिसांच्या ‘रेंज’ बाहेर

माजी आमदार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व त्यानंतर लैंगिक छळाचे गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला तरी या प्रकरणी पोलिसांना

| March 31, 2013 02:19 am

माजी आमदार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संस्थेतील पाच महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व त्यानंतर लैंगिक छळाचे गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला तरी या प्रकरणी पोलिसांना अद्याप त्यांचा संपर्कही होऊ शकलेला नाही.
माने यांच्या संस्थेतील तब्बल पाच महिलांनी ते त्यांच्यावर २००३ पासून शारीरिक अत्याचार करत असल्याच्या गंभीर तक्रारी गेल्या आठवडय़ात केल्या होत्या. यानुसार माने यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात मानेंच्या विरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटला तरी माने यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे.
महिलांवरील अत्याचाराबरोबरच माने यांचा शोध घेण्यात होत असलेल्या या दिरंगाईचाही आता निषेध होऊ लागला आहे. शिवसेना, भाजपच्या महिला आघाडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तर माने यांची ‘पद्मश्री’ पदवी काढून घेऊन संबंधित आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर विभागाचे उपाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी केली आहे. दरम्यान या महिलांवर खरोखरच अत्याचार झाले असतील तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे अॅड वर्षां देशपांडे यांनी सांगितले आहे. रिपब्लिकन पक्षानेही या प्रकरणाची सखोल तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी पोलिसांना माने यांचा शोध लागलेला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी बंद आहे, ते घरी सापडत नाहीत असे पोलिसांच्याकडून सांगितले जात आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी पथके पाठविली होती. परंतु या दोन्ही पथकांना अद्याप माने यांचा शोध लागलेला नाही. माने यांच्या शोधास होत असलेल्या विलंबामुळे या तपासाबद्दल सर्वत्र संभ्रमावस्था व्यक्त होत असून तक्रारदार महिलांनाच संरक्षण देण्याची मागणी अनेक संस्थांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:19 am

Web Title: even after one week laxman mane out of reach
Next Stories
1 जिल्ह्य़ात शिवजयंती जल्लोषात
2 एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात आग
3 आ. औटींचा ठिय्या, २ कर्मचाऱ्यांवर गुन्हे
Just Now!
X