डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ११ किलोमीटरवर जामठा परिसरात राधा-माधव डेव्हलपर्सतर्फे १११ एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या वृंदावन टाऊनशिपमध्ये १ बीएचके, २ बीएचके, ३ बीएचके व ४ बीएचके फ्लॅट्स, सो हाऊसेस, बंगले, डय़ुप्लेक्स व अपार्टमेंटचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. ६ बीएचके प्रशस्त बंगलेसुद्धा उपलब्ध असून ग्राहकांना गुढीपाडव्यापासून सुरू होत असलेलय बुकिंगवर आकर्षक  सूट देण्यात येत आहे. पहिल्या ५० ग्राहकांना ९९ हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती मनीष अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. वृंदावन टाऊनशिपचे अभियांत्रिकी सल्लागार मे. संघी कन्सल्टिंग इंजीनिअर्स (इं) प्रा. लि. आणि कायदे सल्लागार अ‍ॅड. अतुल पांडे आहेत. या टाऊनशिपमध्ये सात विविध भाग आहेत.  यामध्ये वासुदेव, बलराम, रुक्मिणी, सुदामा, यशोदा व नंद अशी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये क्लब हाऊस, कम्युनिटी हॉल, राधाकृष्ण मंदिर, मल्टिप्लेक्स, स्विमिंगपूल, लँडस्केप्ड् गार्डन, सीबीएसई शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, स्पा आदी सुविधा आहेत. या टाऊनशिपला नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी मिळालेली आहे. दोन वर्षांत निवासी ग्राहकांना ताबा देण्यात येईल. टाऊनशिपच्या ठिकाणी अडीच हजार कामगार काम करीत आहेत. पत्रकार परिषदेला व्यवस्थापकीय संचालक राजेश अग्रवाल, संचालक हार्दिक अग्रवाल, सुशील संघी व ममता संघी उपस्थित होते. बुकिंग व अधिक माहितीसाठी २५३३३२१, ६०५४१११, ८६००४२२२२१, ८६००५११११२ क्रमांकावर किंवा सीताबर्डीवरील हीरा स्वीटस्समोरील कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधावा.