केंद्र शासन, राज्य शासन व महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शासनाच्या जननी सुरक्षा योजना डागा, मेयो, मेडिकल व पाचपावलीत राबविण्यात येत होती.
ही योजना महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असिम गुप्ता यांनी सुरू केली होती; परंतु नवीन अधीक्षक डॉ. गोसावी यांनी मेयो येथे जननी सुरक्षा योजना चालविणाऱ्या संस्थेला अचानक ८ ऑक्टोबर २०१२ ला नोटीस देऊन जननी सुरक्षा केंद्राला कुलूप ठोकल्यामुळे हे केंद्र बंद झाले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जननी सुरक्षा योजना केंद्र तात्काळ सुरू न केल्यास मेयो प्रशासनाविरुद्ध जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी मेयोचे अधिष्ठाता व अधीक्षकांना दिला. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेविका जैतुनबी, वंदना ढिवरे, माया ठवळी, मंजूषा मोहिते उपस्थित
होत्या.