सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. मात्र, जलाशयातून अनधिकृत पाणीउपसा होत आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने विद्युतपंप बंद केले. पण आता ते चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली. सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव आहे. असे असताना जलाशयातून एक हजारावर विद्युत पंपांद्वारे अनधिकृत पाणीउपसा चालू असून महावितरण याबाबत कोणतीच कारवाई करीत नाही, अशी तक्रार पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने ८ जानेवारीला जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. निवेदनात विद्युत पंप जप्त करण्याचीही मागणी करण्यात आली.