स्थानिक सार्वजनिक वाचनालयाच्या महिलांनी गच्च भरलेल्या इंद्रराज सभागृहात रोचक शब्दात पुणे येथील लेखक डॉ. शिरीष पटवर्धन,स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता देवळे यांनी मार्गदर्शन केले.
‘आनंदी चाळीशी, हवीहवीशी’ या विषयावर बोलतांना डॉ. शिरीष पटवर्धन म्हणाले, ढेरी असलेला माणूस दरिद्री. ज्या अवयवांना मेदाने अधिक लपेटलेले असते, तेथे कॅन्सर होऊ शकतो. मेद म्हणजे शरिराची कचराकुंडी. त्यांचा १३ अक्षरी कानमंत्र होता, ‘खरी भूक लागल्यावर हवे ते प्रसन्नचित्ताने सावकाश खा आणि पोट भरायच्या अगोदर थांबा. शिजवलेले अन्न दोनदा खा. बाकी वेळात मोड आलेली कडधान्ये, फळे खा. दररोज व्यायाम करा. तसा व्यायाम २४ तासही करता येतो. दर तासाला दोन मिनिटे शांत बसा.
 ‘गर्भसंस्कार’ या विषयावर डॉ. स्मिता देवळे बोलल्या. प्रश्नोत्तराने त्यांनी अनेकांचे समाधान केले. हा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, प्रसूती व स्त्री रोग संघटना, भंडारा ऑब्ट्रॅट्रिकस अॅंड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आला. याप्रसंगी भंडारा येथील डॉ. पदमावती राव, प्राचार्य डॉ. संगीता रोकडे, डॉ. विशाखा गुप्ते, माधुरी श्रीकांत तिजारे या कर्तृत्ववान महिला, तसेच श्रीकांत तिजारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसूती व स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. मधुकर धारगावे, सचिव डॉ. सीमा कावरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुकडे, सचिव डॉ. नीतीन तुरस्कर व सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह डॉ. जयंत आठवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शुभदा कुळकर्णी, डॉ. लीना जोशी, डॉ. सरला अग्रवाल व डॉ. वसुधा आठवले यांनी केले. या कार्यक्रमात ‘शरीर काही सांगते आहे’, हे स्वरचित अतिशय समयोचित गीत माधुरी तिजारे यांनी गायले.