News Flash

वृत्तपत्र वाचकांवर अतिरीक्त भरूदड अन्यायकारक

भंडारा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वर्तमानपत्राचा वाटप खर्च जानेवारी २०१३ पासून प्रती वर्तमानपत्र ग्रामीण भागासाठी मासिक २० रुपये, तर शहरी भागासाठी मासिक १५ रुपये आकारण्याचा निर्णय

| April 3, 2013 02:46 am

भंडारा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वर्तमानपत्राचा वाटप खर्च जानेवारी २०१३ पासून प्रती वर्तमानपत्र ग्रामीण भागासाठी मासिक २० रुपये, तर शहरी भागासाठी मासिक १५ रुपये आकारण्याचा निर्णय घेऊन आकारणे सुरू केले. हा वाचकांवर अन्याय आहे, अशी भूमिका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जिल्हा शाखेने घेतली आहे.
वर्तमानपत्राच्या देयकात ते खरेदी करणाऱ्याला वाटपाचा खर्च, वर्तमानपत्राच्या किमतीत जोडून दाखविला जातो. तो वेगळा दाखविणे आवश्यक होते. वर्तमानपत्राच्या छापील किमतीपेक्षा अधिक पैसे घेणे दखलपात्र गुन्हा आहे. पंचायतीच्या म्हणण्याप्रमाणे छापील किमतीत वाचकांना घरपोच वर्तमानपत्र मिळणे, हा वाचकांचा हक्क आहे. या हक्कावर गदा येत असल्यामुळे वाचक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकतात. अखिल भारतीय पंचायत समितीच्या मते वर्तमानपत्राची किंमत वगळता अन्य पैशाच्या बाबींचा व्यवहार वृत्तपत्र विक्रेता व वृत्तपत्रमालक यांच्यातील आहे. त्यामुळे वाचकांवर विनाकारण भरूदड नको.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कमिशन वाढवून मागण्याची भूमिका आणि वृत्तपत्र मालकाची त्या संबंधातील भूमिका वाचकांसमोर येणे आवश्यक आहे. कोणाची भूमिका आठमुठेपणाची आहे, हे वाचकांना त्वरित कळणे आवश्यक आहे. वृत्तपत्र मालकांचा प्रतिसाद सकारात्मक नसेल, तर वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ताबडतोब वृत्तपत्र विकणे बंद करावे. वाचकांवर भरूदड बसविण्याच्या गुन्ह्य़ात सामील होऊ नये, असे ग्राहक पंचायत भंडारा जिल्ह्य़ाचे अध्यक्ष वि.मा. उमाळकर यांनी कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:46 am

Web Title: extra charge of supply will get back from newspaper readers is
Next Stories
1 विदर्भाची शेती पारंपरिक चक्रव्यूहाच्या फे ऱ्यात
2 एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा कडकडीत ‘नागपूर बंद’
3 अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांचा जीवघेणा संघर्ष
Just Now!
X