भाईंदरला राहणारी स्नेहा अत्रे (नाव बदलेले) सकाळी उठली ते अनोळखी फोनने. अश्लील संभाषण करणाऱ्या पलीकडच्या व्यक्तीकडे तिने दुर्लक्ष केले. पण थोडय़ा वेळाने तिच्या मैत्रिणीच्या जे सांगितले ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कुणीतरी फेसबुकवर तिचे अश्लील छायाचित्र टाकून बनावट फेसबुक अकाऊंट उघडले होते. त्यावर स्नेहाची खरी माहिती आणि फोन नंबर होता. त्यामुळे तिच्याशी अश्लील संभाषण करणारे फोन तिला येऊ लागले. तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा हे कृत्य स्नेहाच्या माजी प्रियकराने केल्याचे उघड झाले. दोघांची ओळखही फेसबुकवर झाली होती. बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते. (बदनामी टाळण्यासाठी स्नेहाच्या कुटुंबियांनी तक्रार केली नाही. नंतर ते प्रोफाईल नष्ट करण्यात आले)
फेसबुवरून बदनामी आणि फसवणूककशी होते, हे कळण्यासाठी स्नेहाचे उदाहरण बोलके ठरावे. तंज्ञत्रान हे जसजसे दैनंदिन जीवनाचा भाग बनू लागले तसे त्याचा गैरवापरही वाढला. फेसबुक, ऑकुर्ट, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवरून बदनामी, फसवणूक आणि धमकी देण्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे सर्वात जास्त तक्रारी या सोशल नेटवर्किंग साइटवरून होणाऱ्या गुन्ह्यांच्या असतात. दररोज अशा स्वरूपाच्या ४ ते ५ तक्रारी या एकट्या सायबर सेलकडे येत असतात. विविध पोलीस ठाण्यात स्थानिक स्वरूपाच्या येणाऱ्या तक्रारी वेगळ्या.
यासंदर्भात सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले की ऑनलाइन फसवुणकीत नोकरी, लॉटरी, विविध गुंतवणुकीच्या माध्यामातून फसवणूक होते. तसेच ईमेल अकाऊंट, वेबसाइट हॅकिंग आदी प्रकारांचा समावेश होतो. पंरतु सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि बदनामी गेल्या वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. तरुणांमध्ये फेसबुकचा मोठा वापर होतो. त्यावरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर लग्नातही होते. पण त्याचबरोबर फसवणुकीतही होते. या प्रकरणातले बहुतांश आरोपी फिर्यादींच्या परिचयाचे असतात. पण त्याचबरोबर फेसबुकवरील माहितीचा छायाचित्रांचा गेैरफायदा घेऊन फसवणुकीच्या घटनाही घडत असतात.

मॉडेलच्या नावाने फसवणुक
११ जानेवारी २०१३
घाटकोपर येथे राहणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाची प्रसिद्ध मॉडेल आंचल कुमार हिच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. दररोज ते चॅटिंगच्या माध्यमातून बोलतही होते. एकदा या व्यावसायिकाला आंचलकुमारने मेसेज पाठवला. मी कॅनडात फसले आहे, माझा मोबाईल हरवला आहे. मला पैशांची गरज आहे. १० हजार रुपये माझ्या मित्राला त्वरीत दे. ते माझ्याकडे पोहोचतील. तो व्यावसायिक पैसे घेऊन ठरल्या ठिकाणी गेला. तेथे १४ वर्षांचा शाळकरी मुलगा पैसे घेण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याला थोडा संशय आला. त्याची चौकशी केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. त्या अल्पवयीन मुलाने मॉडेल आंचल कुमारचे खोटे अकाऊंट उघडून या व्यावसायिकाशी मैत्री करत त्याला लुबाडण्याची योजना आखली होती
फेसबुकवरून २२ लाखांचा गंडा
२२ फेब्रुवारी २०१३
फेसबुकवरून एका महिलेची काही जणांशी ओळख झाली. परदेशात व्यवसाय करण्यासाठी या सहा जणांनी तिला आमिष दाखवले. ही महिला मुंबईतल्या खाजगी कंपनीत मोठय़ा पदावर काम करत होती. आम्ही मलेशियात एका जहाजावर अडकलो आहोत आणि समुद्री चाच्यांनी आम्हाला घेरले आहे. सुटकेसाठी तिला २२ लाख रुपये देण्याची गळ घातली. या महिलेने कसलीही खातरजमा न करता त्यांनी दिलेल्या विविध खात्यावर ते २२ लाख रुपये जमा केले. व्यवसायासाठी लागणारे पैसे त्यांनी तिल्या अशाप्रकारे आपल्या सुटकेसाठी वळविण्यास सांगितले होते. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली आणि ठाणे पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.   फेसबुक दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनले असले तरी ते सुरक्षित नाही हे वारंवार सिद्ध होत आहे.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

ही सावधगिरी बाळगा
*  आपले फेसबुक अकाऊंट शक्यतो खासगी ठेवा
* अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावधगिरी बाळगा
* वैयक्तिक माहिती, फोन नंबर वॉलवर टाकू नका
* व्यक्तिगत छायाचित्रे ‘प्रतिबंधित’ करा. मित्र सोडून इतरांना ती दिसणार नाहीत याची काळजी घ्या.
* आपले लॅपटॉप आणि पीसी पासर्वडने सुरक्षित केलेला असावा.
*  पालकांनीही मुलांच्या फेसबुकवरील मित्रांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

फेसबुकवर अकाऊंट बनविणे सोपे आहे. साध्या फोटोशॉपच्या आधारेही चेहरा बदलून (मॉर्फिंग) एखाद्याची बदनामी करणे सोपे जाते.त्यामुळे फेसबुकवरून बदनामी करण्याच्या घटना वाढत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. येणाऱ्या काळात अशा घटनांचे प्रमाणही वाढणार असून सायबर पोलिसांपुढे त्याचे मोठे आव्हान ठरले आहे.