01 December 2020

News Flash

कोल्हापूरच्या तोतया अन्नभेसळ अधिकाऱ्यांना सांगोल्याजवळ अटक

आपण अन्न व औषधभेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामटय़ांनी एका व्यापाऱ्याला तू गुटखा विकतोस म्हणून खटला भरण्याची धमकी देत गंडविल्याची घटना सांगोला तालुक्यातील

| June 23, 2013 01:59 am

आपण अन्न व औषधभेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामटय़ांनी एका व्यापाऱ्याला तू गुटखा विकतोस म्हणून खटला भरण्याची धमकी देत गंडविल्याची घटना सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे घडली. दोघा भामटय़ांना शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
युवराज लक्ष्मण लोंढे (वय २१) व दिगंबर अप्पासाहेब कटबू (वय २१, दोघे रा. वणूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. पंढरपूर-मिरज रस्त्यावर सांगोला तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे अमोल दत्तात्रेय घाडगे (रा. हातीद, ता. सांगोला) यांचे आकाश बेकर्स अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर एचएच ४५ एफ १०१० ही इनोव्हा कार येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या दोघा तरुणांनी घाडगे यांच्याकडे गुटखा देण्यास सांगितले. तेव्हा घाडगे यांनी आपण गुटखा विकत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांची नजर चुकवून या दोघा तरुणांनी आपल्याजवळील गुटख्याचा पुडा दुकानात टाकला आणि तू गुटखा विकतोस काय, आम्ही अन्न व औषधभेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व पोलीस आहोत, अशी बतावणी करीत त्यांना धमकावले. खटला भरण्याची धमकी देत या दोघांनी घाडगे यांच्याकडून ११००रुपयांची रोकड बळजबरीने नेली. त्या वेळी आरडाओरडा ऐकून आसपासच्या नागरिकांनी या दोघा भामटय़ांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सांगोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी या दोघांविरद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सहा तोळय़ांचे मंगळसूत्र पळविले
जुळे सोलापुरात गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास बीना ओमप्रकाश चौधरी (वय ४६, रा. कोणार्कनगर, जुळे सोलापूर) या पतीसह मोटारसायकलवरून घराकडे निघाल्या असता वाटेत पाठीमागून मोटारसायकलवरून भरधाव वेगाने आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळय़ातील ६२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 1:59 am

Web Title: fake adulterated food officers arrested of kolhapur near sangola
टॅग Arrested,Kolhapur
Next Stories
1 राष्ट्रवादीची जंबो, तरीही अपूर्ण कार्यकारिणी!
2 प्रोफाईल वॉलसाठी निळवंडे प्रकल्पाचा निधी?
3 बिबटय़ाच्या मादीचे पिंज-यातून पलायन
Just Now!
X