10 April 2020

News Flash

वीजप्रश्नी शेतकरी रस्त्यावर

सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात असलेल्या १२ गावांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने ही गावे अंधारात आहेत. वारंवार निवेदन देऊनही महावितरणने दखल न घेतल्याने संतप्त

| December 6, 2013 01:48 am

सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात असलेल्या १२ गावांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने ही गावे अंधारात आहेत. वारंवार निवेदन देऊनही महावितरणने दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर येऊन हत्ता पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले.
धानोरा बंजारा, ब्राह्मणी, काळखेडा, कापडसिंगी, ननसी, सालेगाव, उटी पूर्णा, डोंगरगाव, बन, वझर खु., बर्डा, िपपरी या गावांना जिंतूर तालुक्यातील वझर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही १२ गावे सेनगाव तालुक्यात असून वीजपुरवठय़ाची सर्व कामे सेनगाव उपविभागाकडे आहेत. परंतु या विभागाकडून या गावांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. या १२ गावांतील शेतकऱ्यांनी हत्ता पाटीवर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या दीड महिन्यापासून वीज खंडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हल्ली उपलब्ध पाणी शेतीला देण्यास वीजपंप चालू करता येत नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी होती. जि. प. सदस्य चंद्रकांत हराळ, डोंगरगावचे सरपंच अंकुश राठोड, कापडसिंगी सरपंच सविता हराळ, बामनीचे उद्धव चव्हाण, उटी सरपंच सुभाष वाकडे, सालेगाव सरपंच यादव थोरात, पं. स. सदस्य सुभाष सानप, माधव गडदे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2013 1:48 am

Web Title: farmer on road in issue of electricity
टॅग Electricity,Hingoli
Next Stories
1 शब्दवेल प्रतिष्ठानचे राज्य पुरस्कार जाहीर
2 जादूटोणाविरोधी कायद्याला विरोध करणार – आ. जाधव
3 वार्षिक निधी खर्चात लातूरची राज्यात बाजी
Just Now!
X