12 August 2020

News Flash

कराडमध्ये शेतक-यांची निदर्शने, घोषणाबाजी

उसाला रास्त भाव जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनांनी दिलेली अंतिम मुदत आज ३० ऑक्टोबरची राहिल्याने कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलद कृतिदलासह चोख बंदोबस्त तैनात

| October 31, 2013 02:00 am

उसाला रास्त भाव जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनांनी दिलेली अंतिम मुदत आज ३० ऑक्टोबरची राहिल्याने कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलद कृतिदलासह चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ठिकठिकाणी शेतक-यांनी निदर्शने व घोषणाबाजी करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकरी संघटनेने आपल्या भूमिकेचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले.
ऊसदरासंदर्भात शेतक-यांच्या हितार्थ व लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कराड तालुक्यातील कार्वे व विंग येथे शेतक-यांनी जोरदार निदर्शने केली. त्यात पोलिसांनी कार्वे येथे १२ जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तर, विंग येथे आंदोलन करणाऱ्या ११ जणांना समज देण्यात आली आहे. शेतक-यांची ठिकठिकाणी निदर्शने झाली. मात्र, सर्वत्र शांततेचे वातावरण होते असे कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन जगताप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2013 2:00 am

Web Title: farmers announcement show in karad
टॅग Farmers,Karad,Show
Next Stories
1 सांगली जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी बिनविरोध
2 जायकवाडीचे पाणी रोखून कालव्यांना सोडले
3 महिला शिक्षकांचे आत्मक्लेश आंदोलन
Just Now!
X