ट्रॅक्टर व मोटारसायकल यांची धडक बसून घडलेल्या अपघातात मोटारसायकलवरील ऊसतोड कामगार असलेल्या दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. मंगळवेढय़ाजवळ हा अपघात घडला. मल्हारी धोंडिबा बिचकुले (वय ५५) शिंगू मल्हारी बिचकुले (वय १८,रा. खुपसुंगी, ता. मंगळवेढा) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. हे दोघे ऊसतोड कामगार असून मोटारसायकलवरून खुपसुंगी येथून बेगमपूरकडे निघाले होते. परंतु मंगळवेढय़ाजवळ एका ट्रॅक्टरची धडक बसल्याने दोघा पिता-पुत्राचा मृत्यू झाला. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या अपघताची नोंद झाली आहे.