News Flash

सोलापुरात ढगांची गर्दी; तरीही वरुणराजाकडून निराशाच

सोमवारी शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मोठय़ा पावसाची अपेक्षा होती. परंतु वरूणराजाने निराशा केली.

| June 11, 2013 01:43 am

सोलापूर जिल्ह्य़ात मृग नक्षत्राच्या पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली असून सोमवारी शहर व परिसरात सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभरात अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मोठय़ा पावसाची अपेक्षा होती. परंतु वरूणराजाने निराशा केली.
दरम्यान, सोमवारी वातावरणात गारवा जाणवत असताना तापमान ३२.७ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे उन्हाळा सरल्याची चाहूल लागली. दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे मोठा व समाधानकारक पाऊस बरसण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्याप्रमाणे पाऊस पडावा म्हणून सर्वाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सायंकाळी काही मिनिटे पावसाचे थेंब पडले. हलका पाऊस झाल्याने अनेकांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. अक्कलकोट येथे २ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात उर्वरित भागात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 1:43 am

Web Title: feint of rain to solapur
टॅग : Solapur
Next Stories
1 विवाहितेच्या खूनप्रकरणी जन्मठेप झालेल्या तिघांना हायकोर्टात जामीन
2 सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे
3 नद्यांना मारक जलपर्णी निर्मूलनाचे यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून तयार
Just Now!
X