महोत्सव होणे ही काळाची गरज असून त्यामुळे मराठी उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी एक प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होते व या महोत्सवातूनच छोटय़ा उद्योजक मोठे होत असतात, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
मी नवी मुंबईकर प्रतिष्ठान आयोजित कोळी-आगरी महोत्सवाच्या उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई शिक्षण मंडळ सदस्य अ‍ॅड रेवेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
 विधानसभेत एकही कोळी आमदार नाही. आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे, अशी खंत कोळी समाज महासंघ अध्यक्ष अनंत तरे यांनी यावेळी व्यक्त करत आगरी समाजाने आपले वर्चस्व विधानसभेत दाखवले आहे, असे आवाहन त्यांनी केले.
 उद्घाटनप्रसंगी खासदार राजन विचारे, नवी मुंबई पोलीस आयुक्त  के.एल.प्रसाद आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ‘दादू, आले रे’ या कोळी-आगरी वाद्यवृंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.