News Flash

वर्गणीवरून २ गटांत हाणामारी; तीन जखमी

गणपतीच्या वर्गणीवरून दोन गटांत हाणामारी होऊन तीनजण जखमी झाले. औंढा नागनाथपासून जवळच परभणी रस्त्यावरील ढाब्यावर हा प्रकार घडला.

| September 15, 2013 01:53 am

गणपतीच्या वर्गणीवरून दोन गटांत हाणामारी होऊन तीनजण जखमी झाले. औंढा नागनाथपासून जवळच परभणी रस्त्यावरील ढाब्यावर हा प्रकार घडला.
औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील काही युवक शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नॅशनल ढाब्यावर गणपतीची वर्गणी मागण्यास गेले होते. तेथे असलेल्या पानटपरीच्या मालकासोबत वर्गणीवरून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात ज्ञानेश्वर बोबडे, रावसाहेब बोबडे व सोपान बोबडे जखमी झाले. पानटपरीवरील साहित्याची मोडतोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशोक घोरबांड सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. या वेळी दोन्ही गटांतील लोकांनी पळ काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:53 am

Web Title: fighting in two group on contribution 3 injured
टॅग : Hingoli
Next Stories
1 ग्रंथमित्र पुरस्काराने पिंपळकर सन्मानित
2 अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मॉडेल – चिखलीकर
3 ‘शतकोटी’चे पितळ उघडे
Just Now!
X