News Flash

सल्या चेप्यावरील गोळीबारप्रकरणी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

सराईत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर २० ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र येथील दिवाणी न्या. जे. ए. शेख यांच्याकडे दाखल

| December 7, 2013 02:01 am

सराईत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर २० ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र येथील दिवाणी न्या. जे. ए. शेख यांच्याकडे दाखल केले. दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त असून, या प्रकरणाचा युवराज साळवे सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
सल्या चेप्यावर जिल्हा सत्र न्यायालयात ३० ऑगस्ट रोजी गोळीबार झाला. त्यात त्याच्यासह अन्य दोन नागरिक जखमी झाले होते. सल्यावर मुंबईत जसलोक रुग्णालयात उपचार झाले. त्याच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या पथकाने केला. त्यात युवराज सर्जेराव साळवे व जयवंत सर्जेराव साळवे (दोघे, रा. कोपर्डे हवेली), सूरज ऊर्फ बाळू सर्जेराव पाटील (जोतिबा मंदिरामागे, मंगळवार पेठ), किरण गुलाब गावित (सैदापूर), अमोल संपत मदने व संकेत नारायण पवार (बनवडी), मंदार कृष्णराव मदने (करवडी), अनिल चौगुले, अभिनंदन झेंडे व भानुदास धोत्रे (कराड) अशी आरोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. सल्या मारेल या भीतीनेच त्याला मारण्याचा कट रचल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. पोलिसांकडून अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:01 am

Web Title: filed against ten member in salya chepe firing case
Next Stories
1 शांततेचा दूत हरपला- विखे
2 दोघा पोलिसांमध्ये ठाण्यातच हाणामारी
3 कृषी व पणन मंत्र्यांच्या जिल्हय़ात गलथान व्यवस्था
Just Now!
X