अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिती करीत असतांना िहदूचे िहदूस्थान, तर मुस्लिमांचे पाकिस्तान, अशा पध्दतीने विभाजन करण्यात आल्यामुळे भारत हा िहदूचा, तर पाकिस्तान मुस्लिमांचा देश आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी काही दिवसांपूर्वी िहदू व भगवा दहशतवाद, असा दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या असासंदीय भाषेचा वापर केला आहे. िहदूंच्या देशातच िहदूंना दहशतवादी संबोधून त्यांनी राष्ट्रद्रोह केल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी विश्व िहदू परिषदेचे विदर्भ प्रातांध्यक्ष विजय वालिया यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विश्व िहदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय सिंघानिया, कमल जयस्वाल, विजय माताडे, मििलद देशकर, भाऊसाहेब मारोडकर उपस्थित होते.
इतिहासपूर्व व राजा महाराजांच्या काळात भगव्या रंगाला त्यागाचा रंग म्हणून गौरवण्यात आले आहे. िहदू धर्मातील साधूसंतही याच रंगाची वस्त्रे परिधान करतात, तसेच देशाच्या राष्ट्रध्वजातही भगवा रंग आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी िहदू व भगवा दहशत, असा शब्दाचा प्रयोग करुन राष्ट्रध्वजाचाच अपमान केला आहे. यापूर्वीही पंजाबमधील दहशतवादाला सरकारमधीलच काही पक्षांनी शिख दहशतवाद, असे संबोधले होते. शासनातील काही मंत्री अशा शब्दांचा  प्रयोग करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही प्रकरणात िहदू धर्मातील व्यक्ती सापडल्या आहे. त्यांचे ते प्रकरण न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने त्यांना अजून दोषी ठरविलेले नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच काहींनी बाहेरच निर्णय जाहीर करून देशातील सर्व िहदूंना दहशतवादी संबोधले आहे. धर्माच्या नावावर सरकार राजकारण करीत असल्याचा आरोपही वालिया यांनी केला. सरबतजितसिंग यांना विश्व िहदू परिषदेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली, तसेच सरबजितसिंगला मारहाण करणारे पाकिस्तानी लष्कराचे सन्य असल्याचा  आरोप करून याचा पुरावा म्हणून वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांचा त्यांनी आधार दिला. पाकिस्तानात सरबजीतसिंग यांचे ह्रदय व किडनी काढल्याचेही ते म्हणाले. रामजन्मभूमीच्या विषयावर बोलतांना ते म्हणाले की, न्यायालयाने ही जमीन रामलल्लाची असल्याचे मान्य केले आहे. मात्र, तरीही या जागेचे विभाजन करण्यात आले. आता हा जागा रामजन्मभूमी न्यासला मिळावी, यासाठी देशभरात रामनामाचा जप सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.