नागपूर-रामटेक मार्गावरील कन्हान-कांद्री शिवारातील एका शेतात लहान मुलांना खेळताना गुप्त धन मिळाल्याने परिसरात चर्चेचे पेव फुटले आहे. ताब्यांच्या गडव्यात आढळून आलेली ५४ चांदीची नाणी कन्हान पोलिसांनी जप्त केली आहे.
कांद्री येथील शिवनगर झोपडपट्टीच्या मागे शिशुपाल जगन्नाथ यादव यांचे शेत आहे. ही शेतजमीन पडित असल्याने तेथे परिसरातील मुले खेळतात.
नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुले क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेत असणाऱ्या एका मुलाचा पाय जमिनीवर पडताच जमिनीतील तांब्याचे भांडे थोडे वर फेकले गेल. या भांडय़ातून चांदीचे शिक्के वर आले. सुरुवातीला मुले घाबरली. त्यांनी हे भांडे बाहेर काढले असता त्यात चांदीची नाणी असल्याचे लक्षात आले. मुलांच्या ओरडण्याने जवळच बकऱ्या चारणाऱ्यांनी घटनास्थळी येऊन त्यातील काही नाणी लंपास केली.
घटनेची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका जागरुक नागरिकांनी कन्हान पोलिसांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ऋषभ तराणी, कमलेश चव्हाण या मुलांकडून तसेच इतरांकडून ५४ नाणी जप्त केली. या नाण्यांवर दोन्ही बाजूने अरबी भाषेत मजकूर लिहिला आहे. प्रत्येक नाण्याचे वजन अंदाजे १० ते १५ ग्रॅम असून ते जाड स्वरूपाचे आहे. ही सर्व नाणी पुरातत्व विभागाकडे देणार असल्याचे कन्हान पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वांगे यांनी सांगितले. दरम्यान, पुरातत्व विभाग ही नाणी कोणत्या कालखंडातील आहे, याचा शोध घेणार आहे.

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात
Bhandara, Youth Murdered, Body Burn, Destroy Evidence, Enmity, garada village, lakhani taluka, police, crime news, marathi news,
भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..