पार्वती चित्रमंदिराजवळ असलेल्या बिग बझारमध्ये शुक्रवारी किरकोळ स्वरूपात आग लागली. वातानूकुलीत यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेवून आग आटोक्यात आणली.     
पार्वती चित्रमंदिर जवळ बिग बझार स्टोअर्स आहे. तेथे आज नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले होते.दुपारी वातानूकुलीत यंत्रणेला आग लागली. त्यातून धूर येत असल्याचे पार्िकंग उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी ही माहिती आतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारघटनास्थळी अग्नीशमन दलाचे दोन बंब दाखल झाले. या पथकाने आग लागलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करून ती आटोक्यात आणली. आग वेळीच आटोक्यात आणल्याने तिचा फारसा उपद्रव झाला नाही.व्यवस्थापनानेही आगीमध्ये फारसे नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे. तथापी बिग बझारमध्ये आगलागल्याने मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.