News Flash

औंढा नागनाथ मंदिर परिसरातील दुकानाला आग

औंढा नागनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री ९.३० वाजता लागलेल्या आगीत दोन दुकाने जळाली. यामध्ये २ लाखांचे नुकसान झाले. मंदिर परिसरात सध्या यात्रा सुरू आहे. सूचना

| March 17, 2013 12:10 pm

औंढा नागनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री ९.३० वाजता लागलेल्या आगीत दोन दुकाने जळाली. यामध्ये २ लाखांचे नुकसान झाले. मंदिर परिसरात सध्या यात्रा सुरू आहे. सूचना मिळाल्यानंतर तहसीलदार स्वरूप कंकाळे व पोलीस निरीक्षक विजय जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
औंढा नागनाथ मंदिर परिसरात प्रभाकर काकोडकर यांच्या मिठाईच्या दुकानाला आग लागली. याच दुकानाला लागून दयानंद घुले यांचे खेळण्याचे दुकान आहे. त्या दुकानाला आगीने घेरले. यामध्ये साहित्य जळाल्याने दोन लाखांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:10 pm

Web Title: fire to shop in aundha nagnath mandir area
टॅग : Fire
Next Stories
1 कवडसे भावभावनांचे
2 उदगीरमध्ये संचारबंदी
3 औंढा नागनाथ बस स्थानकात बॉम्बची अफवा
Just Now!
X