News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबारात बीड जिल्ह्य़ातील जवान हुतात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना झालेल्या गोळीबारात बीडमधील जवान हुतात्मा झाला. अन्य एका घटनेत एका जवानाचा अपघातात गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना मृत्यू

| June 16, 2013 01:35 am

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना झालेल्या गोळीबारात बीडमधील जवान हुतात्मा झाला. अन्य एका घटनेत एका जवानाचा अपघातात गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना मृत्यू झाला.
विनोद भारत पिंगळे (वय २०, घोसापुरी, जिल्हा बीड) असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलात रायफल बटालियनमध्ये कार्यरत असलेला घोसापुरी येथील जवान विनोद पिंगळे सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना झालेल्या गोळीबारात हुतात्मा झाला. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत गडाकवाडी (तालुका पाटोदा) येथील पोपट गोरे (वय २५) या जवानाचा पंजाबमध्ये सैन्यदलात कर्तव्यावर असताना अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावला. पंजाबात सैन्यदलामध्ये तो कार्यरत होता. कर्तव्यावर असताना अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2013 1:35 am

Web Title: firing in jammu kashmir soldier martyr in bid district
टॅग : Firing,Soldier
Next Stories
1 कयाधू नदी प्रथमच वाहती
2 हिंगोली जिल्ह्य़ास वर्षांकाठी ५ हजार बाटल्या रक्ताची गरज
3 जालन्यात पेरणीयोग्य पाऊस
Just Now!
X