सांस्कृतिक संचालनालयातर्फे नागपूर आणि अमरावती केंद्रावर घेण्यात आलेल्या दहाव्या राज्य बालनाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नागपूरच्या सोमलवार हायस्कूल निकालस शाळेच्या ‘गंध एक अनामिक चाहूल’ या बालनाटय़ास प्रथम, उत्थान केंद्राच्या ‘भट्टी’ आणि अमरावतीच्या शिवकमल बहुउद्देशीय महिला फाऊंडेशनतर्फे सादर केलेल्या ‘न संपणारी गोष्ट’  बालनाटय़ाला तृतीय क्रमांक मिळाला.
नागपूर आणि अमरावती या केंद्रावर दोन सत्रामध्ये ७ ते १७ जानेवारी दरम्यान बालनाटय़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण २६ बालनाटय़े सादर करण्यात आली. यावेळी प्रथमच नागपूर आणि अमरावती अशा दोन केंद्रावर प्राथमिक स्पर्धा आयोजित केली असली तरी निकाल मात्र दोन्ही मिळून देण्यात आला आहे.
जवळपास सर्वत नाटय़ संस्थांनी अतिशय चांगली नाटके सादर केलीत. नेहमीच रसिकांच्या अल्प उपस्थितीमुळे आणि रद्द होणाऱ्या बालनाटय़ामुळे गाजणारा बालनाटय़ महोत्सव यंदा मात्र प्रथमच सुरळीत पार पडला.
नागपूर आणि अमरावती केंद्रावर झालेल्या बालनाटय़ाचे परीक्षण रमेश कदम, राजीव चुरी, किरण देशपांडे व शुभम डोंगरदिवे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल – दिग्दर्शन- प्रथम – श्रीकांत धबडगावकर (नाटक-एक अनामिक चाहुल), द्वितीय- सांची जीवने ( नाटक-भट्टी), नेपथ्य – प्रथम – अश्विनी गोरले (नाटक- गंध एक अनामिक चाहुल), द्वितीय – सुरेंद्र आवळे (भट्टी), प्रकाश योजना – प्रथम – प्रफुल्ल गुल्हाने ( न संपणारी गोष्ट), द्वितीय – हेमंत गुहे (थेंबाचे टपाल), उत्कृष्ट अभिनय- रौप्य पदकव तीन हजार रुपये रोख – नहुष मोडक (गंध एक अनामिक चाहुल), सायली तुपे (भट्टी). रंगभूषा- आसावरी रामेकर (नाटक- चिन्ह), द्वितीय- पा्रजक्ता फडणवीस (एक दिव्य तारा),
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र – रक्षदा मुलकळवार (एक दिव्य तारा), आदिती हरदास (ह्य़ाला जबाबदार कोण), बकुळ धवणे (थेंबाचे टपाल), वैष्णवी बोडे (झेप), रुपेश ढोले (न संपणारी गोष्ट), प्रतिक भगत (थेंब थेंब श्वास), शुभम डोंगदिवे (ब्लास्टींग माईंड), जय पानेकर (मदर्स डे).