शिवकाळात जुलमी सत्तेविरुद्ध समाजमन जागृत करण्याचे कार्य करणाऱ्या शाहिरी कलेला सध्या राजाश्रय मिळत नाही, अशी खंत शाहीर शिवाजी पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बागलाण तालुका मनसेच्या वतीने आयोजित ‘रंग शाहिरी कलेचा’ या कार्यक्रमात व्यक्त केली.  
राष्ट्रहितासाठी शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीची सद्य:स्थितीत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी शिवकालीन खंडोजी खोपडे प्रकरणासह सद्य:स्थितीत देशात होणारे विविध घोटाळे, भ्रष्टाचार या विषयांवर पोवाडे सादर केले. उद्घाटन शिवराज घोडे यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. संजय पाटील होते. तहसीलदार  अश्विनीकुमार पोतदार, मनसे उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी शिव पुतळ्याचे पूजन केले. डॉ. पाटील, जाधव यांसह अरविंद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिकांत कापडणीस यांनी केले. सूत्रसंचालन पुष्पलता पाटील यांनी केले.