News Flash

अन्न व औषध प्रशासनाचे कायदे सक्षम, परंतु अंमलबजावणीसाठी ‘हात’ कमी

स्थानिक सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला भेट दिली असता, या कार्यालयाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५, औषध जादूटोणा,

| January 11, 2013 02:25 am

स्थानिक सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला भेट दिली असता, या कार्यालयाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५, औषध जादूटोणा, आक्षेपार्ह जाहिरात कायदा १९५४, औषध किंमत नियंत्रण आदेश १९९९ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ या कायद्यांची प्रामुख्याने अंमलबजावणी केली जाते, परंतु अंमलबजावणीचे प्रमाण अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पूर्णपणे होत नाही, असेही कळले. सहाय्यक आयुक्त (औषधे) हे पद रिक्त आहे. याशिवाय, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही कमी आहेत.
सहाय्यक आयुक्त (अन्न) मो.शं. केंबळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षांत एकूण ५३५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. पैकी ४६ आस्थापनांचे परवाने रद्द केले गेले. रजिस्टर्ड फार्मासिस्टचे ३५ परवाने निलंबित झाले आहेत. १०४ औषध नमुन्यांपैकी ७ नमुने अप्रमाणित घोषित करून त्यांच्यावर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहे. या वर्षांत मानदाप्रमाणे नसलेल्या ३३ नमुन्यांपैकी ५ प्रकरणात ५ खटले दाखल झाले आहे. आतापर्यंत एकूण ६४ नमुने हे कायद्यातील तरतुदीनुसार नव्हते. २५ नमुने अप्रमाणित, ८ नमुने केवळ दोषांचे, ६ नमुने हे भेसळयुक्त अन्नपदार्थाचे व २५ नमुने मानवी सेवनास असुरक्षित होते. आतापर्यंत ५४ धाडीत जप्तीत ३८,०५,८७७ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यात १४ लाख ७ हजार १९० रुपये किमतीचा साठा हा गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूयुक्त पदार्थाचा आहे.
नुकत्याच टाकलेल्या छाप्यात साकोलीतील जनता दूध डेअरीत दुधात पावडरची भेसळ, तर भेंडाळा (पवनी) येथील आदित्य दूध डेअरीत खाण्याच्या सोडय़ाची भेसळ आढळून आली. भंडारा शहरात राबविलेल्या मोहिमेत सहा मोठय़ा हॉटेल व मिठाई दुकानांवर व १५ हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई केली गेली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी १२०० रुपये दंड केला गेला, तसेच शैक्षणिक संस्थांच्या जवळ तंबाखूजन्य पदार्थ, साठा व विक्री केल्याप्रकरणी ७६०० रुपये तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला, तसेच जनजागृतीसाठी प्रदर्शनांद्वारा प्रयत्न केला जातो, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 2:25 am

Web Title: food and medicine laws now made strong but no any implementation
टॅग : Law
Next Stories
1 स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त डॉ. शेवडे यांची व्याख्यानमाला
2 जिल्ह्य़ात बारा वर्षांत डेंगूचे २१० रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
3 शहरात २३ नवी गस्ती वाहने दररोज २४ तास फिरणार
Just Now!
X