News Flash

दुष्काळी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांना रेशनकार्डवर धान्य

दुष्काळी भागातून अन्यत्र स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना शिधापत्रिका व त्यावरील धान्य देण्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी

| March 14, 2013 06:40 am

दुष्काळी भागातून अन्यत्र स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना शिधापत्रिका व त्यावरील धान्य देण्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दुष्काळी-टंचाईसदृश भागातून कुटुंबीय रोजगारासाठी तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित होत असल्याची माहिती दिली जात आहे. अशा स्थलांतराची शक्यताही आहे. अशा स्थलांतरित कुटुंबीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रेशनकार्ड तसेच रेशनधान्य उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार कार्यवाही हाती घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 6:40 am

Web Title: food grains on ration card to migrate family in famine areas
Next Stories
1 शिवाजीराव कदम यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी धान्य
2 बेळगाव : महापालिका जिंकली, आता लक्ष सीमावादाकडे
3 कोल्हापुरात टोलआकारणी सुरू करण्याच्या हालचाली
Just Now!
X