वनांचे आणि वन्यजीवांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने राबवण्याकरिता करावयाच्या कामांचे नियोजनासाठी राज्यस्तरीय समितीची दोन दिवसांची बैठक नागपुरात नुकतीच आयोजित करण्यात आली.
सेमिनरी हिल्सवरील वन सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए.के. सक्सेना होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए.एस.के. सिन्हा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) श्रीभगवान, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व्यवस्थापन) ए.के. सिन्हा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) बी.एस.के. रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व धोरण) मोहन झा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना) करुणाकरण हे सर्व राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक (केंद्रीय) भोपालचे एस.के. भंडारी, प्रादेशिक संचालक, भारतीय वन सर्वेक्षक व्ही.एन. अंबाडे प्रमुख पाहुणे होते. बैठकीत वनसंरक्षक (कार्यआयोजना) नाशिकचे क्लेमेंट बेन यांनी मालेगाव वनखाते, वनसंरक्षक (कार्य-आयोजना) चंद्रपूरचे डॉ. प्रवीण चव्हाण आणि औरंगाबाद येथील वनसंरक्षक (कार्यआयोजना) यांनी त्यांच्या वनवृत्तातील कार्य आयोजनाविषयीचे सादरीकरण केले. या बैठकीत पुनर्निर्मितीच्या पद्धती, त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, वनस्पतींची वर्गवारी, त्याच्या उपचार पद्धती अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.