स्कॉर्पिओ गाडीवर ‘पोलीस’ अशी ठळक अक्षरे, पोलीस उपायुक्त असल्याचे छोटे बोधचिन्ह. रात्रीच्या वेळी पोलिसांना संशय आला तो गाडीच्या नंबर प्लेटच्या बाजूला असणाऱ्या ‘शिवसेना’ अक्षरावरून. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने गाडीचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही. पाठलाग करून पकडले तर त्याने पोलिसांशीच हुज्जत घातली. तोतया पोलीस उपायुक्ताचा हा थाट बघून पोलीसच चक्रावले. पोलिसांनी आरोपीला िरगणात घेतले तेव्हा कळाले, हा प्रकार एका स्थानिक अभिनेत्याने केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.
शहरातील जळगाव टी पॉईंटवर गस्तीस असणाऱ्या पोलिसांना स्कॉर्पिओ गाडीवरील ‘पोलीस’ अशी इंग्रजी अक्षरे, तसेच गाडीचा क्रमांक एमएच २० ४१११ असताना ‘११११’ दिसावा, अशा पद्धतीने लिहिलेला असल्याने संशय आला. गाडीच्या मागे ‘शिवसेना’ अशी अक्षरेही होती. गाडी थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पण आरोपी थांबले नाहीत. पारिजातनगर येथे पोलिसांनी आरोपीला गाठले. या वेळी सुभाष हरिचंद्र पवार ऊर्फ राज पवार हा नशेत तर्र होता. त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. गाडीची झडती घेतली तेव्हा गाडीत अंबर दिवा, पोलीस उपायुक्ताची वर्दी आढळून आली.
पोलिसांना ‘बनावट पोलीस उपायुक्त’ सापडला. पण आरोपी सुभाष पवारने याने गाडीतील हे साहित्य एका चित्रपटासाठी म्हणून ठेवले असल्याचा दावा केला. जालना जिल्ह्यातील विरेगावजवळ ‘राज का राज’ चित्रपटात पवार हा पोलीस उपायुक्ताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे हे साहित्य गाडीत होते, असे त्याचे म्हणणे होते. जालना पोलिसांकडून शूटिंगसाठी परवानगी घेऊन हे साहित्य व गाडीवर पोलीस अक्षरे लिहिली होती.  या गाडीत असणारे सुभाष पवार (वय ३६ वष्रे), प्रमोद सुरेश कचकुरे (२१ वष्रे), बिभीषण मोहन रोडे (२२ वष्रे) यासह शिवसेनेचे कार्यकत्रे ज्ञानेश्वर पुंडलिक िशदे यांच्यावर शासकीय कामात अडथळा व अन्य कलमान्वये मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.