News Flash

आश्रमशाळेतून मुलीस पळवणाऱ्या चौघांना अटक

तालुक्यातील टाकळी येथील आदिवासी आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अपहृत मुलगी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

| March 17, 2013 01:16 am

तालुक्यातील टाकळी येथील आदिवासी आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अपहृत मुलगी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या दि. ३ ला कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस आरोपी अंजलीबाई, तिचा पती कृष्णा घुले, लताबाई भोकरे व एक अल्पवयीन मुलगा या चौघांनी तुझा भाऊ दवाखान्यात दाखल आहे असे सांगून फूस लावून रांजणगाव, कुंभेफळ, जि. औरंगाबाद येथे पळवून नेले, तिला तेथे घरात डांबून ठेवले. बारा ते तेरा दिवसांनंतर येथील पोलिसांना फिर्यादी महिलेनेच माहिती दिली. पोलिसांनी कुंभेफळ येथे येऊन सापळा रचला व चार जणांना पकडले. अपहृत मुलीस ताब्यात घेतले. या चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यात अल्पवयीन मुलाचा समावेश आहे, अशी माहिती तपास अधिकारी राहुल पवार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:16 am

Web Title: four arrested in girl abduction case
Next Stories
1 डिजिटल फलकांविरूध्द कारवाईस सोलापुरात पोलीस बंदोबस्ताचे कारण
2 शिक्षणाशिवाय मुस्लिमांची प्रगती नाही – आ. हुसेन
3 लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरणार- डॉ. कदम
Just Now!
X